जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत पालोदकर महाविद्यालयाचे वर्चस्व

Foto
छत्रपती संभाजीनगर,   जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा प्रकारात पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरासाठी निवड झाली. तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत महाविद्यालयाने मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, सचिव डॉ. राहुल पालोदकर, प्राचार्य अशोक पंडित यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजी नगर जिल्हास्तरीय मनपा हद्दी बाहेरील शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. आट्यापाट्या क्रीडा प्रकारात १४ वर्षे वयोगटातील मुले व मुली जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर निवड झाली. १७ वर्षे वयोगटातील मुली जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर निवड झाली, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुली जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. तर सेपक टकरा क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर १४ वर्षे वयोगटातील मुली तृतीय क्रमांक व १७ वर्षे वयोगटातील मुली तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचं व प्रशिक्षक प्रदीप कानडजे, गजानन सपकाळ, जयश्री चापे यांच कौतुक करताना प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयाच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ति प्रशंसा करण्यायोग्य आहे. विद्यार्थी आणि प्रशिक्षकांच्या मेहनतीचा हा परिणाम आहे की आज तालुक्यापासून जिल्हास्तरापर्यंत आट्यापाट्या सारख्या प्रकाराच्या खेळात सर्वात जास्त संख्येने आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी चमकले आहेत व भविष्यात सुद्धा विभागीय स्तरावर अशीच कामगिरी कराल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक दिलीप जाधव, कृष्णा भांडारे, सुनील तांबे, सुनील सागरे, राजेश ठोंबरे, प्रफुल्ल कळम, कृष्णा पाटील, भास्कर केरले, योगेश निंभोरे, राजाभाऊ भोसले, गणेश दिवटे, विक्की चांदुरकर, संजय जाधव, डॉ. रमेश काळे, महादेवी ठवरे, संतुकराव मोरे, अक्षय निकम यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.